MUMBAI | नरेंद्र मोदी व अमित शाह हे या राज्याचे गुन्हेगार व आपराधी आहेत- संजय राऊत
ऑन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खा.श्रीकांत शिंदे
- गेल्या काही दिवसांपासून गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य म्हणजे महाराष्ट्र राज्य, राज्यसरकार.
- मंत्रालयात गुंड मुख्यमंत्री व त्यांच्या बाळराजांना भेटायला येत आहेत.
- मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स हे गुंड व माफिया लावत आहेत.
- अनेक कॉन्ट्रॅक्ट्स गुंडांना दिले जातात.
- 8 हजार कोटींचे ऍम्ब्युलन्सचे कॉन्ट्रॅक्ट हे कोणाला मिळाले आहे ? त्यामध्ये किती माफिया सहभागी आहेत हे लवकरच बाहेर येईल.
- शिंदे यांच्या टोळीमध्ये गुंड व पोलिस एकाच टोळीत आहेत.
- कल्याणला गणपत गायकवाडांनी गोळीबार केला. त्यात एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदेंचे नाव आले होते.
- एकनाथ शिंदेंची पोलिसांनी लगेच चौकशी करायला हवी होती.
- दुसरे कोणी असते तर त्याची चौकशी केली असती.
- झारखंडच्या मुख्यमंत्र्यांना अटक होऊ शकते पण महाराष्ट्रात गुंडाना पाठीशी घालणाऱ्या मुख्यमंत्री यांना जाब विचारला जात नाही.
ऑन घोसाळकर हत्या
- काल घोसाळकरांची निर्घुण हत्या झाली आहे.
- ह्यात महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.
- महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असे कधीच घडले नाही.
- पुणे, नगर, राहौरी इथे हत्या झाल्या आहेत,मुंबईत अभिषेक घोसाळकरांची हत्या झाली आहे.
ऑन देवेंद्र फडणवीस
- या राज्याचे गृहमुख्यमंत्री कुठे आहेत ते अदृश्य झाले आहेत.
- गृहमंत्री विदर्भात चाय पे चर्चा करत आहेत.
- महाराष्ट्रातील बिघडलेल्या कायदा व सुव्यवस्थेवर चर्चा कधी होणार ?
- अतिशय अपयशी व अकार्यक्षम गृहमंत्री आहात.
- आज देवेंद्र फडणवीस दिल्लीला महाराष्ट्रात नवीन खून करण्याची सुपारी घ्यायला गेले आहेत का ?
ऑन नरेंद्र मोदी अमित शहा
- नरेंद्र मोदी व अमित शाह हे या राज्याचे गुन्हेगार व आपराधी आहेत.
- त्यांनी हे सरकार माहराष्ट्रावर लादलेले आहे.
- हे सरकार बरखास्त करा व राष्ट्रपती राजवट लावा.
- तुमचे आमदार,खास पोलिसांना धमक्या देत आहेत.
- याला कायद्याचे राज्य म्हणतात का ?
ऑन मुख्यमंत्री वाढदिवस
- आज वाढदिवस आहे म्हणजे आज शंभर एक गुंड येतील.
- मुंबईत एका लोकप्रतिनिधीची दिवसाढवळ्या हत्या होते आहे आणि तुम्ही वाढदिवस साजरे करता.
- मी त्यांना एवढ्याच शुभेच्छा देईल की दीड वर्ष भोगलेत,महाराष्ट्राची वाट लावलीत आता दूर व्हा.
- खोके जमले, खोके वाटले गेले आमच्या लोकांना तुरुंगात टाकले आता बस झाले.
ऑन अजित पवार
- ही गोष्ट फायदा घेण्याची आहे का?
- तुमच्या चिरंजीवांचे फोटो येत आहेत,त्यावर बोला.
- अजित पवार हे आर्थिक माफिया आहेत.
ऑन मॉरिस
- मुख्यमंत्र्यांच्या गटात येण्याचे त्याला आमंत्रण दिले होते.
BYTE- संजय राऊत,खासदार
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai