BEED | वडवणीत व्यापार्याची दुचाकी अडवत ५१ लाख केले लंपास; वडवणी पोलिसांकडून शोध सुरु
कापुस विक्री केलेल्यानंतर मिळालेले ५१ लाख रुपये घेवून येत असलेल्या व्यापार्याला लूटल्याची घटना बीडच्या वडवणी नजीक घडली आहे. शामसुंदर लांडे यांनी केज येथील जिनींगवर कापुस विक्री केला होता. त्याचे आलेले 51 लाख रुपये घेवून ते वडवणीकडे येत होते. यावेळी त्यांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले. नेमकी त्याच वेळी एक चारचाकी गाडीही तेथे आली. त्यातून आणखी तिघेजण खाली उतरले. या सर्वांनी मिळून लांडे यांना काठीने मारहाण करत त्यांच्याकडील पैशाची बॅग घेवून पोबारा केला. यानंतर लांडे यांनी तत्काळ वडवणी पोलिस ठाणे गाठत तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणात पोलिसांनी तीन तपास पथके रवाना केली असल्याची माहिती वडवणी पोलिस निरिक्षक अमन शिरसट यांनी सांगितले आहे.
BYTE- अमन शिरसट, पोलीस निरीक्षक वडवणी
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Crime
Region:BEED