JALGAON | हातभट्टीने दारू तयार करण्याचे रसायन नष्ट; चोपडा पोलिसांची कारवाई
चोपडा तालुक्यातील ग्रामीण भागात हातभट्टीची दारू बनविण्यासाठी वापरण्यात येणारे रसायन व हातभट्टीची दारू नष्ट करण्याची कारवाई ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यात ग्रामीण भागातील चार गावात ही कारवाई करण्यात आली. या कारवाई मध्ये हातभट्टीची दारू व दारू तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन असा 20700 रुपयाचा माल नष्ट करण्यात आला आहे. याविषयी चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहीती ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक कावेरी कमलाकर यांनी दिली.
BYTE : कावेरी कमलाकर, पोलीस निरीक्षक
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 9, 2024
Published:Feb 9, 2024
Type:Standard
Category:Crime
Region:JALGAON