BULDHANA | दोन लाखाची बॅग चोरणाऱ्यांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, ५ दिवसांची पोलीस कोठडी
ANC - रेल्वेस्टेशन नजीक एका चहाच्या दुकानावर गुलजम्मा शहा हे चहा पिण्यासाठी १२ फेब्रुवारी रोजी थांबले असता, चोरट्यांनी त्यांच्या गाडीतून दोन लाख रुपये असलेली बॅग लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. डीबी पथकाने आपले नेटवर्क सक्रीय करीत चार चोरट्यांच्या काही तासातच मुसक्या आवळीत त्यांना अटक केली आहे. व त्यांच्या कडून तीन दुचाक्या व मोबाईल जप्त केले आहे. गुलजम्मा शहा हे रेल्वेस्टेशन जवळील एका चहाच्या दुकानावर चहा पिण्यासाठी थांबले होते, त्यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनातून चोरट्यांनी दोन लाख रुपयांची बॅग लंपास करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी दोन युवकांनी शिनी प्रभाकर नायडू (वय २०) रा. नाकी ता. नवापूर जि. नंदुरबार याचा पाठलाग करुन त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले होते. पोलिसांनी तपासचक्रे फिरवित शिनीची कसून चौकशी करुन त्याच्या साथीदारांची माहिती मिळवित पवनसिंग रामसिंग राजपूत, व्हीजॉन शिवानंदराव व मोहन व्यंकट नागेशराव अतीबा तिन्ही रा. हैद्राबाद अशी अटक केलेल्या चोरट्यांची नाव असून त्यांनी उत्तर प्रदेश मध्ये सुद्धा असाच गुन्हा केल्याची माहिती मिळाली आहे. तर तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
BYTE - प्रविण नाचनकर, पोलीस निरीक्षक, शहर पोलीस स्टेशन खामगाव
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:Crime
Region:Buldhana