MUMBAI | राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरेंना उमेदवारी जाहीर
राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. यात काँग्रेस नेते माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हांडोरे यांना ही उमेदवारी जाहीर झाली आहे. हंडोरे हे मुंबईमधील काँग्रेसचे मोठे नाव आहे. आंबेडकरी चवळवळीत ही त्यांचे प्रस्थ आहे. मात्र विधानपरिषदेत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. मात्र आता त्यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्याने त्यांनी पक्षश्रेष्ठींचे आभार मानले आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत कोणीही जाणार नाही. पक्षश्रेष्ठी आणि मविआच्या प्रमुख नेत्यांनी पाठिंबा दिला आहे तर राज्यसभेवर निवडून जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी शाश्वती यावेळी हंडोरे यांनी व्यक्त केली आहे.
BYTE - चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 14, 2024
Published:Feb 14, 2024
Type:Standard
Category:Political
Region:Mumbai