GONDIA | कचारगड यात्रेला आजपासून सुरुवात, आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात यात्रेत सहभागी
ANC - गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुहा आदिवासी बांधवांचे पवित्र श्रद्धास्थान असून, या गुफेत आदिवासी बांधवाचे आराध्य दैवत म्हणजे "पारी कोपार लिंगो" ची मूर्ती आहे. मागील 40 वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरत आहे. या कचारगड यात्रेला महाराष्ट्रासह इतर 18 राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने आपल्या कुलदेवतेची पूजा व दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी हजेरी लावतात. अत्यंत दुर्गम व निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या कचारगड या ठिकाणी ही यात्रा 5 दिवस चालत असते. कचारगडच्या गुफेतूनच आदिवासी बांधवांचा उगम झाला अशी आख्यायिका असल्याचे बोलले जाते. कचारगड मध्ये असलेली गुहा ही निसर्ग निर्मित असून आशिया खंडातील सगळ्यात मोठी गुहा आहे. तसेच या गुहेत जवळपास 5 हजार भाविक एकाच वेळेस दर्शन घेऊ शकतात, इतकी जागा या गुहेत उपलब्ध आहे. कचारगड हा परिसर नक्षलग्रस्त भागात मोडत असल्यामुळे या ठिकाणी होणारी गर्दी पाहता सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मोठ्या प्रमाणात पोलीस बळ देखील या यात्रेसाठी तैनात करण्यात येतो.
BYTE - देव साय, भक्त छत्तीसगड
BYTE - ईश्वर वागाडे, भक्त महाराष्ट्र
BYTE - कुणाल गोर, भक्त छत्तीसगड
Reporter:Admin RNO
Last Update:Feb 22, 2024
Published:Feb 22, 2024
Type:Standard
Category:News Updates
Region:Gondia