KALYAN | कल्याण आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची अनोखी जनजागृती; अपघातग्रस्तांची वेशभूषा करून वाहनचालकांना दिला धडा
ANC - कल्याण पश्चिम येथे वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी अनोखी जनजागृती मोहीम राबवली. वाहतुकीचे नियम न पाळल्यास होणाऱ्या परिणामांची जाणीव करून देण्यासाठी, अपघातग्रस्ताची वेशभूषा करून वाहनचालकांना धडा शिकवण्यात आला. यावेळी "नो रिल्स, ओन्ली रुल्स" असा संदेश देत नागरिकांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यात आले.
कल्याण पश्चिम परिसरातील सिग्नलवर वाहनचालकांना वाहतूक नियमांची जाणीव करून देण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलिसांनी अभिनव उपक्रम राबवला. यामध्ये अपघात झाल्यानंतर जखमी झालेल्या व्यक्तीची वेशभूषा करून वाहनचालकांना दाखवण्यात आले की, नियम तोडल्यास अशीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. या अभिनव प्रयोगाने अनेक वाहनचालक आणि प्रवाशांचे लक्ष वेधले. अपघातग्रस्त व्यक्तीच्या रूपात असलेल्या कर्मचाऱ्यावर दवाखान्यात सुरू असलेल्या उपचारांचे चित्र उभे करण्यात आले. शरीरावर असंख्य पट्ट्या गुंडाळलेल्या अवस्थेत त्या व्यक्तीने वाहनचालकांना समजावून सांगितले की, वाहतूक नियम मोडल्यास गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. यासोबतच, वाहतूक पोलिसांनी "नो रिल्स, ओन्ली रुल्स," "वाहतुकीचे नियम पाळा आणि अपघात टाळा" असे विविध बॅनर हातात घेऊन जनजागृती केली. या मोहिमेचा उद्देश नागरिकांना वाहतूक नियमांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हा होता. वाहतूक पोलिस आणि आरटीओच्या या अनोख्या उपक्रमाचे वाहनचालक आणि नागरिकांनी स्वागत केले असून, यामुळे अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
BYTE - सुप्रिया गावडे, आरटीओ महिला अधिकारी
Reporter:prem jadhav
Last Update:Feb 27, 2025
Published:Feb 27, 2025
Type:Standard
Category:News Updates
Region:Kalyan